‘कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम’ – कोविडवरील संशोधन होणार संकलित 

‘कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम’ – कोविडवरील संशोधन होणार संकलित 

देशात थैमान घातलेल्या कोरोनाचा सामान करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. देशातील विविध विद्यापीठे, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांनी यावर विशेष संशोधनही करण्यास सुरुवात केली. कोरोनासंदर्भातील हे प्रशंसनीय संशोधन सर्वांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावे आणि आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यास मदत व्हावी, यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि आयआयटी खरगपुरच्या सहकार्याने देशातील सर्व कॉलेज, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांनी केलेले संशोधन एकत्र करण्यासाठी ‘कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम’ हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. यावर सर्व विद्यापीठ, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना त्यांचे संशोधन पाठवण्यास सांगितले आहे. एकत्रित करण्यात येणारी या साहित्य विद्यार्थी व शिक्षकांना याचा फायदा होणार आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालय आणि आयआयटी खरगपुरने कोरोनावरील संशोधन एकत्र करण्यासाठी सुरु केलेल्या ‘कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम’ या प्लॅटफॉर्मवर कोविड-१९ रिसर्च रिसोर्स रिपॉझिटरी म्हणजेच विशेष संग्रहालय सुरु केले आहे. या संग्रहालयामध्ये देशविदेशातील तज्ज्ञाची प्रकाशने, अहवाल, व्हिडीओ, जर्नल्स, कॉन्फरन्स आणि आयडिया कॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही व्यक्तीला आपले संशोधन या प्लॅटफॉर्मसाठी देता येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक व संशोधकाना देशात विस्कळीत स्वरूपात असलेले हे संशोधन एकाच जागेवर व एकाच क्लिकवर मिळावे यासाठी देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यापीठांशी संलग्न कॉलेजचे प्राचार्य यांनी विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, कर्मचारी यांनी केलेले संशोधन संस्थेच्या मेल, संकेतस्थळ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कोविड-१९ रिसर्च रिसोर्स रिपॉझिटरीकडे पाठवण्याची विनंती मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

First Published on: May 5, 2020 8:45 PM
Exit mobile version