‘या’ शहरात पुढील तीन दिवस दूध, पेट्रोल ठराविक वेळेत मिळणार

‘या’ शहरात पुढील तीन दिवस दूध, पेट्रोल ठराविक वेळेत मिळणार

Ahmednagar district is included in the non-red zone area

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता काही शहरामध्ये नियम देखील कडक करण्यात आले आहेत. काही ठिकाणी दूध आणि पेट्रोलच्या ठराविक वेळा देण्यात आल्या असून त्या ठराविक वेळेतच आता दूध आणि पेट्रोल देण्यात येणार आहे. यामध्ये आता यवतमाळ शहराचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता पुढील तीन दिवस यवतमाळमध्ये पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले आहेत.

तीन दिवस बंद राहणार

यवतमाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या ८ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. त्यामुळे यवतमाळ शहर पुढील तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रांपैकी एकाच भागातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यवतमाळ शहर २४ एप्रिल दुपारी १२ पासून २७ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आहेत ठराविक वेळा

या बंद काळात यवतमाळ शहरातील दवाखाने, औषधी दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने आणि त्यांची औषधांची दुकाने २४ तास सुरू राहतील. तर दुधाची दुकाने सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ६ ते ८ पर्यंत सुरु राहतील. तर पशुखाद्याची दुकाने सकाळी ६ ते ९, पेट्रोलपंप सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.


हेही वाचा – धक्कादायक! एकाच एटीएममध्ये गेलेल्या ३ जवानांना कोरोनाची लागण


 

First Published on: April 24, 2020 12:07 AM
Exit mobile version