परदेशात राहणाऱ्या २७६ भारतीयांना करोनाची बाधा – परराष्ट्र मंत्रालय

परदेशात राहणाऱ्या २७६ भारतीयांना करोनाची बाधा – परराष्ट्र मंत्रालय

करोना व्हायरस चाचणी

परदेशात राहणाऱ्या २७६ भारतीयांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. यामध्ये २५५ जण इराणमध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ आणि इटलीमध्ये ५ जण आहेत. लोकसभेमध्ये आज ही माहिती देण्यात आली. लोकसभेमध्ये बुधवारी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली. हाँगकाँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकेत राहणाऱ्या प्रत्येकी एका भारतीयाला करोनाची लागण झाली आहे.

First Published on: March 18, 2020 5:29 PM
Exit mobile version