अबब… हा घ्या जगभरातील करोना रुग्ण बळींचा आकडा

अबब… हा घ्या जगभरातील करोना रुग्ण बळींचा आकडा

‘करोना’व्हायरस

जगभरात करोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस संशयित करोना बाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तसेच नागरिकांची काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनजागृती करण्यात येत आहे. करोनाबाधित रुग्णांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. याशिवाय, शाळा, महाविद्यालये, जीम, माॅल्स, सिनेमागृहे इत्यादी काही भागातील ठिकाणं सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच नागरिकांना घाबरून न जाता. काळजी घेण्याचे आवाहन सर्व स्तरावरून केले जात आहे.  परंतु, धक्कादायक असा जगभरातील करोना रूग्ण आणि बळींचा आकडा समोर आला आहे.

देश – रुग्ण – बळी

चीन – ८०८२४ – ३१८९
इटली – १७६६० – १२६६
इराण – ११३६४ – ६११
दक्षिण कोरिया – ८०८६ – ७२
स्पेन – ५२३२ – १३३
जर्मनी – ३६७५ – ०८
फ्रान्स – ३६६१ – ७९
अमेरिका – २२९१ – ५०
जपान – १४३० – २८
स्वीत्झर्लंड – ११३९ – ११
भारत – १०७ – ०२

First Published on: March 15, 2020 8:06 PM
Exit mobile version