राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३३ वरुन ३७ वर

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३३ वरुन ३७ वर

करोना व्हायरस

राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक नव्याने करोना रुग्ण आढळला आहे. यामुळे राज्यात करोनाची संख्या आता ३३ वरुन ३७ वर गेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. वाढत्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. शुक्रवारी ही संख्या १९ वर होती तर रविवारी ही संख्या ३३ झाली. मात्र, एका दिवसात महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३७ इतकी झाली आहे. दरम्यान, देशात १११ रुग्ण असून एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक ३७ करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रातील ३७ जणांचा समावेश

मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावले उचलली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रविवारी मुंबईत जमावबंदी आदेश लागू केला आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरात आयोजित करण्यात येणार्‍या मुंबई दर्शनसारख्या सर्व प्रकारच्या सहलींवरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, देश भरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १११ झाली असून त्यात महाराष्ट्रातील ३७ जणांचा समावेश आहे.

रुग्णांवर बहिष्कार घातल्यास कारवाई

करोना रुग्णांच्या नातेवाइकांशी कोणी भेदभाव, दुजाभाव किंवा त्या रुग्णावर आणि त्याच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकल्यास पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.

गावाकडे जाणार्‍या बसेसना गर्दी  

मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये करोना पसरत असल्यामुळे लोक गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे शहरातून गावाकडे जाणार्‍या एसटी, खाजगी बसेसना गर्दी होत आहे.

राज्यातील मंदिरांमधील गर्दी ओसरली 

महाराष्ट्रातील शिर्डी, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, अक्कलकोट आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरलेली दिसत आहे. यंदा कोरोनाच्या भीतीने गर्दी ओसरलेली आहे.


हेही वाचा – मुंबईत जमावबंदी


First Published on: March 16, 2020 12:47 PM
Exit mobile version