महापालिका कर्मचार्यांवर आता करोनाने हल्ला करणे सुरू केले असून नगररचना व विद्युत विभागांपाठोपाठ आता डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दोन दिवसांत तब्बल १० कर्मचार्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यात ३ सुरक्षा रक्षक, ३ सिस्टरसह, ब्रदर, क्लर्क, वॉर्डबॉय आणि शववाहिका चालकाचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एरवी रुग्ण आढळल्यास संबंधित ऑफिसच्या कर्मचार्यांना क्वारंटाईन केले जाते. हाच न्याय झाकीर हुसेन रुग्णालयातील कर्मचार्यांना लागू व्हावा, अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. रुग्णालयातील कर्मचारीच करोनाचे रुग्ण बनले तर या आजाराशी लढा कोण देणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेतील नगररचना विभागात एका कर्मचार्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेत नगररचना विभागात सर्वाधिक गर्दी असते. त्यात हा कर्मचारी शिपाई असल्याने त्याचा संपर्क या विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचार्यांशी आला आहे. त्यामुळे आता नगररचना विभागातील कोण-कोण क्वारंटाईन होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा ‘मलाईदार’ विभाग असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आपण क्वारंटाईन होऊ नये म्हणून काही कर्मचारी देव पाण्यात बुडवून असल्याचे समजते. याशिवाय पश्चिम विभागातील विद्युत विभागातील एक चालक पॉझिटिव्ह आला आहे. या चालकासोबत काम करणार्या तिघा कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी मोरवाडी येथील रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा चालक तसेच, तेथील एक सिस्टरचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. महापालिकेची मदार ज्या रुग्णालयावर आहे त्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील कर्मचार्यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील सुरक्षाक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर एक महिला कर्मचार्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. महिलेच्या कुटुंबातील सात सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे कळते. मंगळवारी सकाळी शववाहिका चालक, तर दुपारी तीन सुरक्षा सुरक्षारक्षकांसह, क्लर्क, मेट्रन व वॉर्डबॉयचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तसेच, एक पुरुष कर्मचार्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे करोनाचा विळखा आता या रुग्णालयातील कर्मचार्यांनाही बसत असल्याचे विदारक चित्र आहे.
असुविधांच्या गर्तेत कर्मचारी
अन्य कर्मचार्यांनाही जबाबदारी द्या
कर्मचार्यांचा उपयोग डाटा एण्ट्रीसाठी
रुग्णालयात प्रत्येकी २० हजारांचा पगार देऊन नव्याने कर्मचार्यांची भरती केली. मात्र, या कर्मचार्यांचा उपयोग डाटा एण्ट्रीसाठी होतोे. डाटा एण्ट्रीसाठी महापालिकेतील अन्य विभागातील कर्मचार्यांचाही उपयोग होऊ शकतो. या नवीन कर्मचार्यांना आरोग्यसेवेचीच जबाबदारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.