दातार लॅब पुन्हा सुरु

दातार लॅब पुन्हा सुरु

प्रातिनिधिक फोटो

शासकीय आणि खासगी लॅबमधील स्वॅब तपासणीत मोठया प्रमाणात तफावत आढळून आल्याचे चौकशीत समोर आल्याने जिल्हाधिकार्‍यांनी दातार कँन्सर जेनेटिक्स लॅबला कोरोना चाचणीस बंदी घातली होती. यासंदर्भात लॅब व्यवस्थापनाकडून सादर कागदपत्रांचे पुनरावलोक केल्यानंतर ही लॅब पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच दातार लॅबमध्ये कोरोना चाचणी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने कळविले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केलेल्या चौकशीत दातार जेनेटिक्समधून तपासलेल्या नमुन्यांपैकी २७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले. शिवाय फेरतपासणीत १६ पैकी ७ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. म्हणजे दातार लॅबने ४४.४५ टक्के प्रमाणात चुकिचे अहवाल दिल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात नमूद केले होते. त्यानूसार स्वॅब तपासणी थांबवावी, असे अंतरिम आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. जिल्हाप्रशासनाने केलेली कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप करण्यात आला. अहवालाची पुर्नतपासणीची तयारी दर्शवत थेट महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकार्‍यांवर ५०० कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा देत तशी नोटीस प्रशासनाला पाठवली होती.

जिल्हा प्रशासन आणि लॅब व्यवस्थानातील या वादानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दातार लॅबला दिलेल्या भेटीनंतर झालेल्या तपासणीत व्यवस्थापनाने वस्तुस्थिती मांडली असता, जनहिताच्यादृष्टीने हा वाद सुरू राहणे उचित नसल्याने कंपनी प्रशासनाने अब्रुनुकसानीचा दावा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापनाने सादर केलेल्या अहवालात कागदपत्रांचे पुनरावलोकन करून कंपनीने लॅब पुन्हा सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना चाचणीसाठी लॅबच्या माध्यमातून लवकरच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही व्यवस्थापानाने कळविले आहे.

लॅब व्यवस्थापनाने केलेल्या विनंतीनुसार मी स्वतः आमच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांसमवेत लॅबला भेट देवून पाहणी केली. त्याबाबतचा अहवाल तांत्रिक समितीने ३ मार्च रोेजी सादर केला. त्यावर दातार जेनेकटिक्सने कार्यवाही करावी असे नमुद केले आहे. तसेच प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

First Published on: March 3, 2021 9:14 PM
Exit mobile version