एका रुग्णाचा घोळ मिटण्याआधीच संगमनेरात डॉक्टरला कोरोना

एका रुग्णाचा घोळ मिटण्याआधीच संगमनेरात डॉक्टरला कोरोना

संगमनेरमधील संशयित रुग्णांना तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले जात असल्या तरी काही रुग्ण जवळच्या नाशिकमध्ये उपचारासाठी जात आहे. नाशिकच्या रुग्णालयाकडून पाठवल्या गेलेल्या अहवालामध्ये संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील तरुणाचे दोन अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी एक पॉझिटिव्ह तर दुसरा निगेटिव आला आहे. या संदर्भात असलेले संभ्रमावस्था कायम असतानाच आता, सिन्नर तालुक्यातील दापुर येथे दवाखाना असलेले आणि शहरानजीकच्या घुलेवाडी येथील रहिवाशी असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाली आहे.
रुग्णाच्या संपर्कात आल्याने ही लागण झाली असल्याचा संशय असून या डॉक्टरांना मंगळवारी अस्वस्थ वाटू लागल्याने नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचे नाव घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर आज या संबंधीचा अहवाल प्राप्त झाले यात डॉक्टर बाधित असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे तहसीलदार अमोल निकम यांच्याकडून शहर आणि घुलेवाडी लगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान यासंदर्भात प्रशासनाने सावध भूमिका घेतली असून या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे.

First Published on: May 27, 2020 9:44 PM
Exit mobile version