नागपुरात कोरोनाचा हाहाकार! स्मशानात एकाचवेळी ३५ मृतदेहांना अग्नी!

नागपुरात कोरोनाचा हाहाकार! स्मशानात एकाचवेळी ३५ मृतदेहांना अग्नी!

नागपुरात कोरोनाचा हाहाकार! स्मशानात एकाचवेळी ३५ मृतदेहांना अग्नी!

नागपुरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान नागपुरातला एक धडकी भरवनारा व्हिडिओ समोर आला आहे. नागपुरातील एका स्मशानात ३५ मृतदेह एकाचवेळीत जळत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. तसेच या स्मशानाबाहेर आखणीने १० ते १२ रुग्णांचे मृतदेह वेटिंगवर असल्याचे समजत आहे.

नागपुरातील गंगाबाई घाट स्मशानात ही धक्कादायक घटना घडली आहे. या स्मशानभूमीतील विदारक दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकाच वेळीत मोठ्या प्रमाणात मृतदेहाचे अत्यसंस्कार होत असल्यामुळे स्मशानभूमीत नातेवाईकांची एकच गर्दी पाहायला मिळाली होती.

नागपुरमध्ये गेल्या २४ तासांत ६ हजार ८२६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३ हजार ५१८ जण घरी होऊन बरी गेले आहेत. त्यामुळे आता नागपुरमधील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९१ लाख ४३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५ हजार ९०३ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख २४ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ६१ हजार ६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान राज्यात कोरोनाच्या परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे उद्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १५ दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू असणार आहे, याबाबतची घोषण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.


हेही वाचा – Maharashtra Lockdown: ठाकरे सरकार ७ कोटी लाभार्थ्यांना देणार मोफत धान्य


 

First Published on: April 13, 2021 10:17 PM
Exit mobile version