Corona Live Update: MPSC ची पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे

Corona Live Update: MPSC ची पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
कोरोना व्हायरस व्हायरल झाल्यामुळे त्याचे पडसाद शैक्षणिक क्षेत्रावर देखील पडले आहेत. देशासहीत राज्यातही ३१ मार्च पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील आपली परिक्षा पुढे ढकलली आहे. ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे रोजी रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्रात करोना रुग्णाचा आकडा वाढला असून ही संख्या ६४ वरुन ७५ वर पोहोचली असून करोनामुळे आज एका ६३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
Pradnya Ghogale

पंतप्रधान मोदींचे आता सोशल डिस्टंसिंगचे आवाहन

देशभरात जनतेने टाळ्या, थाळ्या, घंटा वाजवून आभार प्रदर्शन केले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोशल डिस्टंसिंगचे आवाहन केले आहे.

Pradnya Ghogale

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पोस्ट कार्यालयातील लोखंडी तिजोरी चोरट्यांनी उचलून नेली होती. मात्र, ती फोडता न आल्याने चिल्हारपाडा शिवारात एका नाल्यात फेकून चोरटे पसार झाले होते. कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी गुन्हे शाखेच्या पथकामार्फत तपासचक्र फिरवत चोरट्यास गजाआड केले. अल्पावधीत ही कारवाई केल्याने टपाल अधिकारी, कर्मचार्‍यांसह नागरिकांनी पोलीस प्रशासनाप्रति समाधान व्यक्त केले.

Pradnya Ghogale

जगात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून जगभरात आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १३ हजारावर गेला आहे. तर तीन लाखाहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी संशयितांना १४ दिवस क्वारनटाईन करण्यात येत आहे. पण हा अवधी पुरेसा नसल्याचा दावा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या इन्फेक्शन कंट्रोल अँड हॉस्पिटल एपिडेमियोलॉजी जर्नलमध्ये संशोधकांनी केला आहे.

Pradnya Ghogale

करोना व्हायरसला अटकाव घालण्यासाठी देशात आणि राज्यात युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. देशात करोनाचे रुग्ण वाढत असताना आता मृतांचा आकडा देखील वाढत आहे. भारतातील रुग्णांची संख्या ३४५ (संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) झाली असून आता सातव्या रुग्णाचा देखील बळी गेला आहे. गुजरातमध्ये करोनामुळे पहिला रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत आहे. सुरत येथील ६७ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे.

टाळ्या अन् थाळ्यांचा कडकडाट; अवघ्या देशानं व्यक्त केली कृतज्ञता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला भारतीयांनी उस्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे. करोनाविरोधात आपल्या जीवावर उदार होऊन राष्ट्रसेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलीस आणि सर्व सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता समस्त भारतीयांनी आपापल्या गॅलरी, खिडकीत येऊन थाळ्या वाजवल्या.

First Published on: March 22, 2020 11:38 AM
Exit mobile version