Corona Vaccination:18 वर्षापुढील नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी कशी आणि कुठे करावी ?

Corona Vaccination:18 वर्षापुढील नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी कशी आणि कुठे करावी ?

Corona Vaccination:18 वर्षापुढील नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी कशी आणि कुठे करावी ?

16 जानेवारीपासून भारतात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून आता 18 वर्षापुढील लोकांचे सुद्धा लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच नव्या नियमांनुसार राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालय सुद्धा लस उत्पादकांकडून लस विकत घेऊ शकतील असे घोषित करण्यात आले आहे.सिराम इन्स्टिट्यूटने ऑफ इंडियाने त्यांच्या लसीचे दर जाहीर केले असून केंद्र सरकारला 150 रुपये अश्या पूर्वीच्याच किमतीत लसीचे डोस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर राज्य सरकारला 400 रुपये आणि खाजगी रुग्णालयांना 600 रुपये दराने लस खरेदी करता येणार आहे.

कुठे कराल नोंदणी ?

Co-WIN अॅप आणि वेबसाइड या डिजिटल अधिकृत प्लॅटफॉर्म वर नागरिकांना  लसीकरणाची  नोंद करण्याकरिता खुला करण्यात आला आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी कशी आणि कुठे करावी पुढील प्रमाणे  :

💉 लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी.

🕹️ https://selfregistration.cowin.gov.in/

👆🏻 या लिंक वर क्लीक करा.

▪️ मोबाईल नंबर रजिस्टर करा व त्यावर आलेला OTP नोंदवा.

▪️ आपला आधार क्रमांक नोंदवा.

▪️ Gender सिलेक्ट करा.

▪️ जन्म वर्ष टाका.

▪️ वरील सर्व माहिती रजिस्टर करा.

▪️ पिन कोड टाका व त्यानुसार आलेल्या तारखेला लसीकरण schedule करा.

📲 आपणांस 2 मेसेजेस येतील त्यातील..

📲 पहिला मेसेज रेफरन्स lD लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे.

📲 दुसरा मेसेज कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे आहे, याचा आहे.

 


हे हि वाचा – आधी रक्तदान करा नंतर लस घ्या, विजय वडेट्टीवारांचे आवाहन

First Published on: April 27, 2021 8:06 PM
Exit mobile version