Corona Virus: मनसे नेते अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Corona Virus: मनसे नेते अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Corona Virus: मनसे नेते अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाची दुसरी लाटेना हाहाकार घातला आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक तीव्र झाला आहे. कोरोनाची लागण सर्वसामान्य नागरिकांपासून ते लोकप्रतिनिधींनाही झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरेंना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असल्यांने कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकरेंची सध्या प्रकृती उत्तम असली तरी त्यांना खबरदारी म्हणून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमित ठाकरेंना यापूर्वीही ऑक्टोबर २०२० मध्ये थोडा ताप आल्यामुळे लीलावती रुग्णालया दाखल करण्यात आले होते. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अमित ठाकरेंना रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपचार केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखली लीलावती रुग्णालया दाखल करण्यात आले होते. राज ठाकरे यांना टेनिस खेळताना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. राज ठाकरे यांची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. राज्यात संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्बंधांचे पालन नागरिक करत नसल्यामुळे आजच्या आढावा बैठकीत या निर्बंधांवर अधिक कठोर निर्णय घेण्यात येणार आहेत. तसेच सकाळी ७ ते ११ या वेळात सर्व दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश सरकारद्वारे देण्यात आले आहेत.

First Published on: April 20, 2021 4:44 PM
Exit mobile version