औरंगाबादमध्ये नव्या १३२ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार ४०७

औरंगाबादमध्ये नव्या १३२ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार ४०७

passenger come from Dubai to Sindhudurg via Goa is corona positive

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत असून आज मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेकॉर्ड मोडला असून औरंगाबादमध्ये १३२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ४०७ झाली आहे. तर यापैकी १ हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले परतले आहेत. तर १२१ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता ९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील

औरंगाबादमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये ५७ महिलांचा तर ७४ पुरुषांचा समावेश आहे. तसेच हे रुग्ण फाजीलपुरा (४), न्यू हनुमान नगर (५), सिडको एन आठ (12), गौतम नगर, घाटी परिसर (२), रशीदपुरा (१), मयूर पार्क म्हसोबा नगर (1), भवानी नगर (२), भारतमाता नगर (३), विजय नगर (१), गारखेडा, गजानन नगर (१), कोहिनूर कॉलनी (1),‍ जिल्हा परिषद परिसर (१), हर्सुल सावंगी (1), सिव्हील हॉस्पीटल परिसर (३), टी व्ही सेंटर (१),बिस्मिला कॉलनी (३), सिडको वाळूज महानगर एक (२), एकता नगर, हर्सुल परिसर (१), बजाज नगर (७), साई नगर, पंढरपूर (३), जुनी मुकुंदवाडी (७), नारेगाव (१), गंगापूर (१), नायगाव (१), सिल्लोड (१), उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर (१), अन्य (१)जयसिंगपुरा, बेगमपुरा (१), मिसरवाडी (१), सुभेदारी विश्रामगृहा जवळ (१), उस्मानपुरा (२), एन आठ (१), जुना बाजार (१), आकाशवाणी परिसर (१), उल्कानगरी (१), संजय नगर (१), एन दोन सिडको (१), गणेश कॉलनी (१), बुड्डीलेन (१), बायजीपुरा (१), बंजारा कॉलनी (१), हेडगेवार रुग्णालय परिसर (१), एमजीएम रुग्णालय परिसर (१), शिवाजी नगर (५), उत्तम नगर (३), कैलास नगर (७), गादिया विहार (१), सहकार नगर (१), नक्षत्रवाडी (१), चेलीपुरा (१), टी.व्ही सेंटर, पोलिस कॉलनी (१), संजय नगर,बायजीपुरा (१), एन सात सिडको (१), न्यायनगर (२), हुसेन कॉलनी (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), सातारा परिसर (१), साईनगर, एन सहा (२), एन आठ सिडको, गजराज नगर (१), पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा (२), हरिप्रसाद अपार्टमेंट (१), दशमेश नगर (१), पद्मपुरा (२), गांधी नगर (३),सिल्कमिल कॉलनी (१),विशाल नगर (३), बेगमपुरा (२), गोविंद नगर (१), समता नगर (१) या भागातील कोरानाबाधित आहेत.


हेही वाचा – औरंगाबादमधील बहिण – भावाच्या हत्येचा उलगडा; चुलत भावानेच केली हत्या


 

First Published on: June 11, 2020 3:37 PM
Exit mobile version