पिंपरी-चिंचवडः सामूहिक नमाज पठण करणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा

पिंपरी-चिंचवडः सामूहिक नमाज पठण करणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा

सामूहिक नमाज पठण करणाऱ्या १३ जणांना बेड्या

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचे लॉक डाऊन असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांनतर सर्वत्र जमावबंदीचे कलम देखील लागू करण्यात आले असून चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या बळींचा संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

तसेच देशभरात असणाऱ्या सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं बंद ठेवण्याचे देखील निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना देखील पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये सरकरच्या आदेशाला धुडकावून लावण्याचा प्रकार घडला आहे. पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात काही मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन रहिवासी इमारतीच्या गच्चीवर सामूहिक नमाज पठण केल्याचा प्रकार नुकतीच उघडकीस आला. या घडलेल्या प्रकारानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – प्रशासनाच्या नाकावर टिचून श्रीरामपुरात गावठी दारूची निर्मिती

लॉकडाऊनदरम्यान आणि जमावबंदीच्या काळात नियमांचे जो कोणी उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला होता.आतापर्यंत ३३३ गुन्हे नियमांचं उल्लंघन केल्या प्रकऱणी दाखल करण्यात आले आहेत. देशभरात अनेक शहरांमध्ये वारंवार आवाहन करूनही अनेक नागरिक लॉकडाऊन आणि जमावबंदीचे आदेश गांभीर्यानं पाळत नसल्याचं समोर येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

First Published on: March 30, 2020 12:58 PM
Exit mobile version