चिंता वाढली! राज्यातील ५ IAS,IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागणी

चिंता वाढली! राज्यातील ५ IAS,IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागणी

देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत आहे. भारातात महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात ५५ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनापासून लोकांचे रक्षण होण्यासाठी पोलीस २४ तास तैनात आहेत. पण पोलिसांनाच मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील सुमारे ५ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या अधिकाऱ्यांवर सध्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या या संकटात पोलीस, डॉक्टर, नर्स आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.

अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटरला प्रशासकीय अधिकारी भेट देत असतात, मंत्र्यांसोबत त्यांचे पाहणी दौरे, बैठका सुरू असतात, त्यामुळे त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असतो. कोरोनाची लागण झालेल्या या ५ अधिकाऱ्यांपैकी २ दाम्पत्य आहेत. एक निवृत्त अधिकारी ज्याला प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. त्याशिवाय एक आयएएस अधिकारी आणि त्याची पत्नी, एक आयएएस महिला आधिकारी आणि त्यांचे आयपीएस पती यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात आतपर्यंत २ हजाराहून जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८९७ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तर १ हाजर ५२ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.  बुधवारी एवघ्या २४ तासात १३१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती.


हे ही वाचा – राज ठाकरेंच्या टीकेनंतर योगींनी ‘तो’ निर्णय घेतला मागे!


 

First Published on: May 28, 2020 3:09 PM
Exit mobile version