Coronavirus: आम्हाला नको लॉकडाऊन; जमावाने केला पोलिसांवर हल्ला

Coronavirus: आम्हाला नको लॉकडाऊन; जमावाने केला पोलिसांवर हल्ला

राज्यात करोना विषाणुचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ लागू करत संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. असे असताना देखील काहीजण रस्त्यांवर फिरत आहेत. नागरिक रस्त्यांवर फिरु नयेत म्हणून पोलीस गस्त घालून आहेत. मात्र, नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिसांवरच जमावाने हल्ला केला आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे बुधवारी ही घटना घडली.

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना सिरसाळा येथे काही पुरुष आणि महिला रस्त्यावर आले होते. पोलिसांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. पोलिस आणि नागरिकांमध्ये चंगलीच धुमश्चक्री झाली. यामध्ये एक कॉन्स्टेबल जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनीच आधी लाठीचार्ज केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या प्रकरणी ९ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: १० कोटी लोकांसाठी १.५ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज

राज्यात करोनाचा फैलाव दिवसागणीक वाढत जात आहे. राज्यात १२२ करोना रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात राज्यात १५ नव्या करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यातील एकट्या मुंबईत ९ जणांची नोंद करण्यात आली आहे.

 

First Published on: March 25, 2020 11:21 PM
Exit mobile version