Coronavirus Update: आज राज्यात १,२७८ कोरोना रुग्णांची नोंद; तर ५३ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात १,२७८ कोरोना रुग्णांची नोंद; तर ५३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्राची अपडेटेड आकडेवारी

राज्यात १२७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,१७१ झाली आहे. आज ३९९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४१९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत.

आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १९, पुण्यातील ५ , जळगाव शहरात ५, धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवड मध्ये १, अहमदनगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदूरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील १४ मृत्यू हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एक मृत्यू आज मुंबई येथे झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणा-या इतर आजारांबाबत १७ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ८३२ झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,३८,७६६ नमुन्यांपैकी २,१५,९०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२,१७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १२३७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२,७६८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात २,४४,३२७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४,४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: May 10, 2020 9:50 PM
Exit mobile version