Coronavirus Update: आज राज्यात तब्बल १६० मृत्यू; ३८७४ नव्या रुग्णांची नोंद!

Coronavirus Update: आज राज्यात तब्बल १६० मृत्यू; ३८७४ नव्या रुग्णांची नोंद!

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच आज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्याचा भडका उडाला आहे. आज दिवसभरात तब्बल १६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यात मृतांचा आकडा ५ हजार ९८४ इतका झाला आहे. त्यासोबतच आज राज्यात ३ हजार ८७४ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील वाढून १ लाख २८ हजार २०५ वर पोहोचला आहे. यातले ६४ हजार १५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ५८ हजार ५४ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.०४ टक्के एवढे आहे.

कोरोनाबाधितांची सविस्तर आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ६५३२९ ३५६१
ठाणे २५५३ ४७
ठाणे मनपा ७१३१ २१३
नवी मुंबई मनपा ५६१३ १५१
कल्याण डोंबवली मनपा ३७६३ ७७
उल्हासनगर मनपा ९७७ ३७
भिवंडी निजामपूर मनपा ९२० ५१
मीरा भाईंदर मनपा २२५५ ९९
पालघर ५५९ १६
१० वसई विरार मनपा २६६६ ७२
११ रायगड १०९२ ३७
१२ पनवेल मनपा १३०७ ५२
  ठाणे मंडळ एकूण ९४१६५ ४४१३
१३ नाशिक ४८९ २९
१४ नाशिक मनपा १२२८ ४७
१५ मालेगाव मनपा ९१८ ६९
१६ अहमदनगर २०९ १०
१७ अहमदनगर मनपा ६४
१८ धुळे २०९ २६
१९ धुळे मनपा २७४ २०
२० जळगाव १७२१ १५४
२१ जळगाव मनपा ४६२ २८
२२ नंदूरबार ८३
  नाशिक मंडळ एकूण ५६५७ ३८९
२३ पुणे ११३० ५०
२४ पुणे मनपा १२७६० ५०५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३९६ ३२
२६ सोलापूर १८२ ११
२७ सोलापूर मनपा १९९६ १६१
२८ सातारा ८२३ ३८
  पुणे मंडळ एकूण १८२८७ ७९७
२९ कोल्हापूर ७०९
३० कोल्हापूर मनपा ३०
३१ सांगली २६७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५
३३ सिंधुदुर्ग १६३
३४ रत्नागिरी ४८२ १७
  कोल्हापूर मंडळ एकूण १६६६ ३६
३५ औरंगाबाद २५८
३६ औरंगाबाद मनपा ३०१५ १७०
३७ जालना ३६० ११
३८ हिंगोली २५२
३९ परभणी ५६
४० परभणी मनपा २८
  औरंगाबाद मंडळ एकूण ३९६९ १८९
४१ लातूर १५४
४२ लातूर मनपा ५८
४३ उस्मानाबाद १६९
४४ बीड ८४
४५ नांदेड ५४
४६ नांदेड मनपा २२५ ११
  लातूर मंडळ एकूण ७४४ ३१
४७ अकोला १२४
४८ अकोला मनपा १०४० ५२
४९ अमरावती ३४
५० अमरावती मनपा ३८२ १८
५१ यवतमाळ २३०
५२ बुलढाणा १५६
५३ वाशिम ७०
  अकोला मंडळ एकूण २०३६ ९४
५४ नागपूर १४४
५५ नागपूर मनपा ११२७ ११
५६ वर्धा १४
५७ भंडारा ७१
५८ गोंदिया १०१
५९ चंद्रपूर ३८
६० चंद्रपूर मनपा २०
६१ गडचिरोली ५४
  नागपूर एकूण १५६९ १५
  इतर राज्ये /देश ११२ २०
  एकूण १२८२०५ ५९८४

 

राज्यात १६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून मृतांची संख्या ५९८४ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत्यू दर ४.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांमध्ये मुंबई १३६, जळगाव १०, पुणे ५, सोलापूर १, औरंगाबाद ६, जालना १, बीड १ असे आहेत.

First Published on: June 20, 2020 11:25 PM
Exit mobile version