Coronavirus Update: आज राज्यात ६५५५ नवीन रुग्ण; तर १५१ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात ६५५५ नवीन रुग्ण; तर १५१ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

आज राज्यात ६५५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २,०६,६१९ झाली आहे. राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज ३६५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण १,११,७४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०८ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात रविवारी नोंदविलेल्या १५१ मृत्यूंमध्ये मुंबई ६९, ठाणे मनपामधील ३, ठाणे १, नवी मुंबई ३३, कल्याण डोंबिवली ८, भिवंडी ३, मीरा भाईंदर १, वसई – विरार ४, नाशिक २, जळगाव ६, जळगाव मनपा ४, पुणे ३, पुणे मनपा २०, पिंपरी चिंचवड ८ आणि औरंगाबाद ११ यांचा समावेश आहे. रविवारी ३६५८ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण १,११,७४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११,१२,४४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,०६,६१९ ( १८.५७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०४,४६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४६,०६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: July 5, 2020 7:54 PM
Exit mobile version