Coronavirus Update: आज राज्यात २,९४० रुग्णांची नोंद, तर ९९ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात २,९४० रुग्णांची नोंद, तर ९९ रुग्णांचा मृत्यू

कोरोना व्हायरसची आजची आकडेवारी

आज राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१६८ झाली आहे. राज्यात ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ३४,८८१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूंबद्दल अधिकची माहिती

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६२ पुरुष तर ३७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ९९ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २१९७ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे ६ मे ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५९ मृत्यूंपैकी मुंबई ३५, पनवेल -७, ठाणे -६, वसई विरार – ६, नवी मुंबई -२, कल्याण डोंबिवली -१ जळगाव- १ तर १ मृत्यू इतर राज्यातील आहे .

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १७.१ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate) ४३.०७ टक्के एवढे आहे. तर मृत्यू दर ३.३७ टक्के आहे. सध्या राज्यात ५,५१,६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५,४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: May 30, 2020 8:30 PM
Exit mobile version