Coronavirus: नागरिकांना दिलासा; पुण्यातील आणखी तीन जण करोनामुक्त

Coronavirus: नागरिकांना दिलासा; पुण्यातील आणखी तीन जण करोनामुक्त

नायडू रुग्णालय

पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन करोनाबाधित रुग्णांना १४ दिवस विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आणि आज त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, नागरिकांना दिलासा मिळाला असून आता पुन्हा उद्या गुरुवारी तीन जणांना घरी सोडण्यात येणार आहे. हे तिन्ही रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांची करोनातून सुटका होणार झाली आहे.

दुबईहून आलेल्या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना विलगीकरण कक्षातही ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची २४ तासात दोनदा चाचणी केल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आणि रुग्णालय प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करत त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता आणखी एक दिलासा देणारी बातमी म्हणजे उद्या तीन जणांना घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.


हेही  वाचा – Coronavirus: गावबंदी म्हणजे औषधापेक्षा इलाज भयंकर


 

First Published on: March 25, 2020 10:57 PM
Exit mobile version