Job alert! त्वरा करा, लॉकडाऊनमध्ये नोकरीची सुवर्ण संधी!

Job alert! त्वरा करा, लॉकडाऊनमध्ये नोकरीची सुवर्ण संधी!

कोरोनाच्या वाढत्या पसारामुळे लॉकडाऊनमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या नोकरीवर गदा येण्याची भिती सतत मनात आहे. मात्र असे असले तरीही चार आठवड्यांमध्ये बऱ्याच कंपन्यांनी दोन लाखांहून अधिक नोकऱ्यांसाठी जाहिराती दिली आहेत. गुगल, अमेझॉन, टेक महिंद्र, वॉलमार्ट लॅब्ज, आयबीएम, केपजेमिनी, डेलॉइट, ग्रोफर्स आणि बिगबास्केट आदी कंपन्यांनी नोकरीसाठी जाहीराती दिल्या आहेत. एकूण नोकऱ्यांपैकी ८०,००० नोकऱ्या एकट्या एंट्री लेव्हल क्षेत्रातील आहेत. त्यामुळे नोकऱ्या शोधणाऱ्या फ्रेशर्स आणि पदवीधारकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

यातील नोकऱ्या ९१ टक्क्यांहून अधिक पुर्ण वेळ असणार आहेत. तर उर्वरीत नोकऱ्या कंत्राटी आणि अर्धवेळ आहेत. एकूण नोकऱ्यांमधील ७९ टक्क्यांहून अधिक नोकऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) आणि संबंधित क्षेत्रांतील आहेत. उर्वरित १५ टक्के नोकऱ्या ई-कॉमर्स आणि वित्तीय (बँकिंग, वित्तपुरवठा आणि इन्शुरन्स) क्षेत्रातील आहेत.

सॉफ्टवेअर आणि नॉन टेक्निकल जॉब्स

जाहिरातींमध्ये सर्वाधिक जाहिराती वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनीअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर्स आणि फुल स्टॅक डेव्हलपर्सच्या जागांसाठी आहेत. नॉन टेक्निकल जॉब्समध्ये सर्वाधिक जागा या सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी आहेत.

लॉकडाऊन नंतरची चिंता मिटली

नवीन भरती थांबवलेली नाही. सध्याच्या अनिश्चित काळात नोकरभरतीचा वेग कमी झाला आहे. मात्र, लॉकडाऊननंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी नोकरभरतीकडे लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. अशी माहिती डेलॉइटटे मुख्य टॅलेंट ऑफिसर एस. व्ही. नाथन यांनी दिली. तर टेक महिंद्रचे चीफ पीपल ऑफिसर हर्षवेंद्र सोइन म्हणाले, आम्ही कंपनीतच नवीन टॅलेंट शोधत आहोत. केवळ विशेष कौशल्ये असणाऱ्यांचीच बाहेरून भरती करण्यात येत आहे.

स्टार्टअपची संख्या वाढणार

देशातील स्टार्टअप उद्योगात नव्या नोकऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. ज्या स्टार्टअपच्या व्यवसायात वाढ झाली आहे, त्यांच्याकडून नोकऱ्यांसाठी नव्याने जाहिराती देण्यात येत आहेत.


हे ही वाचा – Lockdown तरीही कोकणचो आंबो मिळणार देशभर!


 

First Published on: April 21, 2020 9:29 AM
Exit mobile version