CoronaVirus Live Update – दिल्लीत भूकंप, लॉकडाऊनमध्ये नागरिक रस्त्यावर!

CoronaVirus Live Update – दिल्लीत भूकंप, लॉकडाऊनमध्ये नागरिक रस्त्यावर!

झोपेतून जागे व्हा ! IMA ची केंद्राच्या लसीकरणावर टीका अन् Lockdown सल्ला

५ वाजून ४५ मिनिटांनी दिल्ली आणि एनसीआरमध्ये ३.५ रिश्टर स्केलवर भूकंपाचा धक्का. ८ किलोमीटरच्या परिसरामध्ये याचे धक्के जाणवले. दिल्ली, नोएडा, गाजियाबादमध्ये धक्के. तीव्रता कमी असली, तरी ऐन लॉकडाऊनमध्ये नागरिक आले रस्त्यावर. अद्याप कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
गेल्या २४ तासांत देशभरात ९०९ नवे रुग्ण तर ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाची आकडेवारी. तर गेल्या ५ दिवसांत रोज सरासरी ५८४ नवे रुग्ण सापडत आहेत.
आत्तापर्यंत देशभरात १ लाख ८६ हजार ९०६ चाचण्या घेतल्या. त्यात ७९५३ पॉझिटिव्ह आढळल्या – आसीएमआर
खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये चाचणीची क्षमता वाढवणार. निम्हान्सचीही मदत यासाठी घेतली जाणार – आरोग्य विभाग सचिव
संवेदनशील व कामगार नगरी तसेच दाटीवाटीचे शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात शुक्रवार पर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र शनिवारी 65 वर्षीय इसमाचे कोरोना रिपोर्ट पोसिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
वसईतील नालासोपाऱ्यात रविवारी २ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे इथली रुग्णांची एकूण संख्या ३८ झाली आहे. यामध्ये आजवर सापडलेल्या करोनाबाधित रुग्णांमध्ये वसईत १५, नालासोपाऱ्यात १६ आणि विरारमध्ये ७ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णाचा आकडा १८९५ वर, मुंबईत सापडले ११३  नवे रुग्ण
५८ वर्षीय महिलेचा ससून रूग्णालयात उपचारारदम्यान मृत्यू! पुण्यातील मृत्यूची संख्या ३० वर. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी, कासारवाडी भाग सील
गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे देशात ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ९०९ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता देशात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ८,३५६ वर पोहोचली आहे. – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती.
ताज हॉटेलच्या सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
धारावीत कोरोनाचे १५ नवीन रूग्ण. राजीव गांधी कॉम्प्लेक्समध्ये क्वारंटाईन केलेल्या रुग्णांपैकी ९ रुग्ण पॉझिटिव्ह
चीन, अमेरिका आणि जर्मनी यांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत गेला. मात्र आताची परिस्थिती पाहता. या देशांच्या तुलनेत भारतातील करोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
अमेरिकेने टाकले इटलीला मागे..गेल्या २४ तासांत अमेरिकेत १ हजार ८३० जाणांचा मृत्यू.अमेरिकेत २० हजार कोरोनारूग्णांचा मृत्यू!
देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात आतापर्यंत ७५०० इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात महाराष्ट्र राज्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या १७६१ इतकी झाली आहे.
First Published on: April 12, 2020 6:09 AM
Exit mobile version