यवतमाळमध्ये कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद!

यवतमाळमध्ये कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद!

कोरोना मृत्यू आकडेवारी ठरविण्यासाठी नवीन निकष, ICMR चा मोठा निर्णय !

राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. दररोज राज्यात ५० ते ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण आत्तापर्यंत यवतमाळ हे एकमेव राज्य होतं त्या राज्यात एकही मृत्यू झाला नव्हता. ते म्हणजे यवतमाळ. पण आता यवतमाळमध्ये कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.

यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. यवतमाळमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १२५च्या वर गेला आहे. त्यापैकी ९९ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

मृत महिलेची प्रकृती शनिवारपासून खालावली. त्यामुळे या महिलेच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे सुरवातूपासून अतिशय काळजीपूर्वक लक्ष होते. डॉक्टरांनी शनिवारी मध्यरात्रीपासून शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अखेर श्वसनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाला. त्याचबरोबर यवतमाळमध्ये मुंबईवरून आलेल्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या एका व्यकीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


हे ही वाचा- कबीर सिंग बघून ‘तो’ बनला डॉक्टर, अश्लील फोटोवरून महिलांना करायचा ब्लॅकमेल!


 

First Published on: May 30, 2020 1:22 PM
Exit mobile version