कोरोना लढ्यात कचरा वेचणाऱ्या महिलेचाही पुढाकार; १५ हजारांची केली मदत

कोरोना लढ्यात कचरा वेचणाऱ्या महिलेचाही पुढाकार; १५ हजारांची केली मदत

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पुण्यात कचरा वेचणाऱ्या महिलेने केली १५ हजारांची मदत

देशावर कोरोना व्हायरसचे संकट ओढावले आहे. त्यामुळे अनेक स्तरातून कोरोना विरूद्धच्या लढ्यात यशस्वीपणे जिंकण्यासाठी आपल्याला जमेल तशी मदत करण्यासाठी प्रत्येक जण पुढे सरसावत आहे. ही मदत करताना समाजातील विविध स्तरातून मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. आर्थिक मदत पुरवताना अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पीएम केअर्स फंडमध्ये रोख रक्कम सुपूर्द केली आहे. मात्र पुण्यातील कचरावेचक महिलेचे औदार्य सगळ्यांपुढे विशेष ठरत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत या महिलेने आपल्या कमाईतील १५ हजार रुपये देत मदत केली आहे.

साठवलेली कमाई कोरोना लढ्यासाठी दिली

गेल्या २० वर्षांपासून गवळणबाई मुरलीधर उजगरे ही महिला पुण्यात कचरा वेचण्याचे काम करते. यावरच तिचे घर चालते. हे काम करून महिन्याला पाच ते सहा हजार कमावणाऱ्या या महिलेचा हा मोठेपणाच म्हणता येईल. तिच्या या श्रीमंतीची तुलना कशासोबतही करता येणार नाही. आपल्या कमाईतील साठवून ठेवलेले पैसे तिने कोरोनाशी लढण्यासाठी मोठ्या मनाने दिले.

या महिलेने कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री फंड आणि दोन सेवाभावी संस्थांना एकूण १५ हजार रुपय देऊन मदत केली आहे. पुण्यातील धानोरी भागातील भीमनगरमधल्या झोपडपट्टीत गवळणबाई उदगरे राहतात. झोपडपट्टीत राहण्यास असूनही अशा परिस्थीतीमध्येही तिने संकट प्रसंगी मदत करण्याची इच्छाशक्ती दर्शवली आहे. सध्या कोरोनोविरूद्धच्या लढ्यात यशस्वी जिंकण्यासाठी अशाच योद्ध्यांची गरज आहे.


VIDEO: कोरोनाविरुद्ध पुणे पोलिसांनीही कसली कंबर; रक्षणकर्त्यांची आर्त हाक नक्की ऐका!
First Published on: April 14, 2020 10:02 PM
Exit mobile version