CoronaVirus: खुशखबर! बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये देणार!

CoronaVirus: खुशखबर! बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये देणार!

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. त्यात इमारत आणि इतर बांधकाम देखील बंद झालेले आहेत. त्यामुळे या बांधकाम करणाऱ्या कामगारांना रोजगार मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिच बाबत लक्षात घेऊन कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये देणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

बँक खात्यामध्ये थेट जमा होणार

लॉकडाऊन दरम्यान बांधकाम कामगारांना कोणतेही कामकाज करता येत नाही आहे. त्यामुळे त्यांना बांधकामाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या घरी थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नसल्यामुळे त्यांना दररोजच्या गरजांची तजवीज करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने बांधकाम कामगारांचा दोन हजार त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यास मंजूरी देली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या तीन हजार पार झाली असून २०० अधिक कोरोनाचे रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: सप्टेंबरपर्यंत कोरोनाची लस येणार, ब्रिटनच्या वैज्ञानिकांचा दावा!


 

First Published on: April 18, 2020 4:15 PM
Exit mobile version