LIVE – राज्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण, पण ते गंभीर नाहीत – उद्धव ठाकरे

LIVE – राज्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण, पण ते गंभीर नाहीत – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचा इशारा

जगभरात करोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले असून हा करोना व्हायरस आता महाराष्ट्रात येऊन धडकला आहे. पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळले असून त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून आज दुपारपर्यंत त्यांचा अहवाल हाती येणार आहे.
A view of the sea
Pradnya Ghogale

ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण

जगभरात करोनाने थैमान घातले आहे. करोनाने जागतिक स्तरावर ४ हजार हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि १३ हजार हून अधिक संसर्गित झाले आहेत. करोनाने आता ब्रिटनमध्ये शिरकाव केला आहे. ब्रिटनच्या आरेग्यमंत्री नदीन डॉरिस यांनाही करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: नदीन यांनी मंगळवारी दिली.

“मला करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी वैद्यकीय केली असता करोना पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मी स्वत:ला घरामध्ये वेगळे ठेवले आहे.” दरम्यान, आरोग्य विभागाचे अधिकारी सध्या नदीन डॉरीस यांना करोनाची कुठे आणि कशी लागण झाली याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Pradnya Ghogale

करोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार?

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाचवर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. दरम्यान, करोनाचे सावट अधिवेशनावर देखील आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज किती दिवस चालू ठेवायचे यावर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पिय अधिवेशन लवकर गुंडाळणार असल्याची शक्यता आहे.

Pradnya Ghogale

यवतमाळच्या ११ जणांचा पुण्यातील करोनाग्रस्तांसोबत प्रवास

दुबईहून आलेल्या पुण्यातील कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या कुटुंबासोबत यवतमाळ जिल्ह्यातील ११ जणांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चक्रे गतीमान झाली आहेत. यवतमाळच्या ११ जणांना घरातून बाहेर न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. संबंधीत ११ जणांची वैद्यकीय चाचणी दुपारी होणार आहे.

Pradnya Ghogale

विमानातून प्रवास करणारे प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल

करोना बाधीत पुण्यातील कुटुंबासोबत विमानातून प्रवास करणाऱ्या मुंबईतील सहा प्रवाशांना मंगळवारी मुंबई महापालिकेने शोधून काढले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्या सहा प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून आज बुधवार पर्यंत वैद्यकीय चाचणी अहवाल येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेश काकणी यांनी दिली.

Pradnya Ghogale

पुण्यातील शाळा बंद

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या आणि कॉन्व्हेंट शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर मांजरी परिसरातील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल ११ मार्च ते १४ मार्च दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. कात्रज, सिंहगड आणि नांदेड, सिटी परिसरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही शाळांच्या परिक्षेच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे. तर सरकारी आणि महापालिकांच्या शाळा सुरु राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: March 11, 2020 12:16 PM
Exit mobile version