Coronavirus : महाराष्ट्राला बाप्पा पावला! ८ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

Coronavirus : महाराष्ट्राला बाप्पा पावला! ८ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

Maharashtra Corona Update : कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली! राज्यात 24 तासात 711 नवे रुग्ण तर 360 कोरोनामुक्त

राज्यात गणेशोत्सवादरम्यान कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल असा इशारा आरोग्य तज्ञांकडून देण्यात येता होता. पण गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाने राज्यावर कृपादृष्टी केली आहे. कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या शून्यावर पोहचली आहे. राज्यातील आरोग्य विभागाने आकडेवारी जाहीर केली. यात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा दिलासाजनक आकडा समोर आला. राज्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. तर कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही किंचित वाढ झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे तब्बल ८ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाही.

राज्यातील सध्या कोरोना स्थिती पाहिल्यास, ४९,८१२ रुग्ण अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत. तर १० सप्टेंबरपर्यंत ४१५४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. याशिवाय ४४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ४५२४ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले. त्यामुळे बाप्पाचे आगमन होताच ५० हजारांच्या पार पोहचणारी रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी झाली आहे.

या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या शून्यावर

राज्यातील धुळे. हिंगोली, परभणी, अकोला, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया, या जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर पोहचली आहे. तरी देखील राज्यातील कोरोना संकट अद्याप कमी झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अजूनही कोरोना संबंधीत नियम, निर्बंध पाळणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान पुन्हा रुग्णसंख्या वाढणार अशी भीती व्यक्त केली जात होता.


 

First Published on: September 11, 2021 8:29 AM
Exit mobile version