Cruise Drug Bust: एनसीबीच्या कारवाईत संबंध नाही, मुष्यबळ कमी म्हणून मदत केली – मनिष भानुशाली

Cruise Drug Bust: एनसीबीच्या कारवाईत संबंध नाही, मुष्यबळ कमी म्हणून मदत केली – मनिष भानुशाली

एनसीबीच्या कारवाईत संबंध नाही, मुष्यबळ कमी म्हणून मदत केली - मनिष भानुशाली

राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणावरुन भाजप आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले. तसंच, आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती हा मनिष भानुशाली आहे आणि तो भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. यावर आता मनिष भानुशालीने त्याची बाजू मांडली आहे. नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावत एनसीबीच्या कारवाईत माझा काहीही संबंध नाही. अधिकाऱ्यांकडे मुष्यबळ कमी होती म्हणून मदत केली, असं स्पष्टीकरण मनिष भानुशालीने दिलं आहे.

“नवाब मलिक यांनी केलेल आरोप खोटे आहेत. १ ऑक्टोबरला दुपारी माझ्याकडे काही माहिती आली. मुंबईत ड्रग्ज येत असल्याचं माहिती दिली. मुंबईत येत असेल तर आणि युवा वर्गाला वाईट मार्गाला लावण्याचा कट असेल तर त्यांना थांबवायला हवं असं मला वाटलं. त्यानंतर माझ्याकडे आलेली माहिती मी NCB अधिकाऱ्यांना दिली. मी कोणाला ओळखत नाही, मी एक सामान्य नागरिक आहे. एनसीबी कार्यलात २ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता गेलो आणि माहिती दिली. तेव्हा मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की यासंदर्भात आम्हाला २-३ जणांकडून माहिती मिळाली आहे. तुमची पण माहिती खरी आहे. तुमच्याकडे थोडी जास्त माहिती आहे. समीर वानखेडे यांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला विचारलं की माहिती कशी मिळाली आणि कोणी दिली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की ज्यांनी मला माहिती दिली त्यांचं नाव मला सांगायचं नाही आहे. माझ्या जीवाला धोका होऊ शकतो,” असं भानुशाली म्हणाला.

पुढे बोलताना तो म्हणाला की, “क्रुझवर मी नव्हतो. नावं शेअर केली. आम्ही ९ वाजता गेलो. त्यांनी पण त्यांची टीम तयार केली. त्यांची सुट्टी होती २ ऑक्टोबरला…एवढ शक्य नव्हतं,” असं भानुशाली म्हणाला.

आरोपींना का आणलं?

“त्यांना अंदाज नव्हता की एवढी लोकं पकडले जातील. अधिकारी कारवाई करत होते मी बाजूला उभा होतो. एनसीबीकडे मनुष्य बळ कमी होतं. त्यामुळे त्यांनी आमची गाडी घ्यायला लावली. गाडीत सर्वांना बसवलं,” असं स्पष्टीकरण भानुशालीने दिलं.

 

First Published on: October 6, 2021 6:10 PM
Exit mobile version