पुणे: ३८८ रुपयांच्या नेल पॉलिशसाठी ९२ हजारांचा ऑनलाइन गंडा!

पुणे: ३८८ रुपयांच्या नेल पॉलिशसाठी ९२ हजारांचा ऑनलाइन गंडा!

पुणे: ३८८ रुपयांच्या नेल पॉलिशसाठी ९२ हजारांचा ऑनलाइन गंडा!

आजकाल आपण सहसा ऑनलाइन शॉपिंग करतो. कुठेही जाण्याचा वेळ वाचवण्याकरिता ऑनलाइन शॉपिंग करणं सोयीस्कर असतं. मात्र हेच ऑनलाइन शॉपिंग काहीवेळा खूपचं महागात पडतं. असं काहीस पुण्यातील २५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीसोबत घडलं आहे. तिने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून ३८८ रुपयांची नेल पॉलिशची बॉटल ऑर्डर केली होती. मात्र तिला या ३८८ रुपयांच्या नेल पॉलिशसाठी ९२ हजार ४४६ रुपयांना गंडा घातला. खरंतर ही तरुणी सायबर क्राईमची शिकार झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या १७ ते ३० डिसेंबरच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. शनिवारी या तरुणीने वाकड पोलिसांकडे फसवणूक करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिताच्या कलमांन अंतर्गत दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय तिने पोलिसांना आपण कोणालाही बँक अकाऊंटचे डिटेल्स दिलं नसल्याचं देखील सांगितलं.

नक्की काय घडलं?

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, १७ डिसेंबरला या तरुणीने मोबाईलवरून ऑनलाइन वेबसाइटवर नेल पॉलिशची बॉटल ऑर्डर केली. त्यानंतर तिने तिच्या बँकेच्या खात्यातून ३८८ रुपये ट्रान्सफर केले. परंतु नेल पॉलिशची डिलीव्हरी झाली नाही म्हणून तिने कस्टमर केअरशी संपर्क साधून चौकशी केली. मात्र संपर्क साधलेल्या व्यक्तीनं तिला म्हटलं की, पैसे ट्रान्सफर झाले नसल्यामुळे डिलिव्हरी झाली नाही. यानंतर त्यानं या तरुणीचा फोन नंबर मागितला. फोन नंबर दिल्यानंतर काही सेंकदांत तिला मेसेज आला की तिच्या दोन बँक अकाऊंटमधून पाच ट्रांजॅक्शन होऊन ९० हजार ९४६ रुपये गेले आहेत. याशिवाय तिच्या सरकारी बँक अकाऊंटमधून १५०० रुपये सुद्धा गेले होते. एकूण सर्व मिळून ९२ हजार ४४६ रुपये काही सेंकदात गेले. या सर्व प्रकरणाबाबत सध्या अधिक तपास घेतला जात आहे.


हेही वाचा – धक्कादायक! मोबाईलसकट मालकालाही ट्रेन बाहेर खेचले; अंधेरीतील घटना


 

First Published on: February 17, 2020 9:13 PM
Exit mobile version