Cyclone Tauktae: वादळाचे अलर्ट असून NDRF टीम तैनात का नव्हत्या, फडणवीसांचा सवाल

Cyclone Tauktae: वादळाचे अलर्ट असून NDRF टीम तैनात का नव्हत्या, फडणवीसांचा सवाल

Cyclone Tauktae: वादळाचे अलर्ट असून NDRF टीम तैनात का नव्हत्या, फडणवीसांचा सवाल

तौत्के चक्रीवादळानंतर कोकणात अतिशय भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे. याठिकाणी तौत्के चक्रीवादळाची पुर्वकल्पना आली असूनसुद्धा कोणत्याही प्रकारे एनडीआरएफ पथकाची तैनाती करण्यात आली नव्हती. ते जर केले असते तर सिंधुदुर्गमध्ये जे काही नुकसान झाले आणि जे मच्छिमार बांधव मृत्यूमुखी पडले त्यांना वाचवता आले असते. तिथल्या काही बोटी पुर्णपणे नुकसानीखाली गेल्या आहेत. या बोटींचे अजूनही पंचनामे करण्यात आले नाही आहेत. ज्या बोटींचे पंचनामे करण्यात आले आहेत त्या बोटींचे जिथे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान आहे तिथे २० लाखाचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.

मला असे वाटत आहे की, प्रशासना आहे या प्रशासनाला गतिमान केले पाहिजे. प्रशासनावर वचक दाखवला पाहिजे. अन्यथा अशाप्रकारे सरकार जर नुकसानीचे पंचनामे करणार नाही. कागदावर फक्त त्याची नोंद घेऊन असे चालणार नाही. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

मोदींच्या गुजरात दौऱ्यावरील टीकेला प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांच्या राजकीय दौऱ्यावर मला काही राजकीय बोलायचे नाही. अन्यथा मी देखील हे सांगु शकतो. ३ तासाचा त्यांचा दौरा आहे परंतु किती किलोमीटरचा दौरा आहे हे मोजून बघितले तर आजूबाजूच्या गावांचा दौरा आहे. जे लोक प्रश्न विचारत आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातला का गेले महाराष्ट्रात का आले नाही. मग या ठिकाणी महाराष्ट्रात मुख्यमंत्री २ जिल्ह्यात का आले रायगडला का गेले नाही. सातारा, कोल्हापूरला का गेले नाहीत असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. महत्त्वाचे काय आहे तुम्ही येता जाता मागच्यावेळी येऊन गेले परंतु कोकणाला काही दिले नाही. फक्त मोठ्या बाता मारतात याच्या पलिकडे सरकारकडून काहीही होतना दिसत नाही आहे. मागच्या वेळी निसर्ग चक्रीवादळानंतर केलेले मदत अजूनही पोचली नाही आहे आता पुन्हा या ठिकाणी येऊन राजकीय वक्तव्य करत आहेत याचे अजूनही अश्चर्य वाटत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नुकसानग्रस्त मदतीशिवाय वंचित राहणार नाहीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यावेळी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कोकणात जास्त नुकसान झाले असल्याचे सांगितले आहे. तसेच कोकणातील नुकसानग्रस्त मदत मिळाल्याशिवाय वंचित राहणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. जास्त फिरत बसण्यापेक्षा महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करतो आहे. कोकणाला दिलासा देण्यासाठी आलो असून कोकणावर दुहेरी संकट आहे. तोत्के चक्रीवादळाची तयारी इशारा मिळाल्यावर तयारी करत होता. यंत्रणांनाही सुचना दिल्यानंतर त्यांचे पालन केले शेवटी वादळाची तीव्रतेचा अंदाज लावू शकत नाही. दुर्दैवाने मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जवळपास पंचनामे करण्यात आले आहेत. तर येत्या २ दिवसात सर्व पंचनामे पुर्ण होतील. यानंतर घरे, फळबागा, बोटींचे नुकसान असेल इतर नुकसान असेल त्याचा आढावा घेतला जाणार आहे. यानंतर मदत करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु होईल. पंचनामे पुर्ण झाल्यावर अहवाल आल्यानंतर मदतीची घोषणा केली जाईल. कोणताही नुकसानग्रस्त मदशिवाय वंचित राहणार नाही.


हेही वाचा : तौत्के चक्रीवादळ : मदतीशिवाय नुकसानग्रस्त वंचित राहणार नाहीत, फोटोसेशनला आलो नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

First Published on: May 21, 2021 10:50 AM
Exit mobile version