Cyclone Tauktae Mumbai: तोक्तेचा तडाखा, फांदी कोसळल्याने लोकलसेवा ठप्प, खबरदारी म्हणून एअरपोर्ट, मोनोरेलही बंद

Cyclone Tauktae Mumbai: तोक्तेचा तडाखा, फांदी कोसळल्याने लोकलसेवा ठप्प, खबरदारी म्हणून एअरपोर्ट, मोनोरेलही बंद

फांदी कोसळल्याने लोकलसेवा ठप्प

तोक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईच्या वाहतूकीला देखील बसला असून वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या मारर्गावर झाडाची फांदी ओव्हरहेड वायरवर कोसळली. यामुळे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकादरम्यान फांदी कोसळली आहे. यामुळे काही काळासाठी मध्य रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. तर खबरदारी म्हणून मुंबई विमानतळ आणि मोनोरेल सेवा बंद करण्यात आली आहे.

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. जोरदार वारा सुटल्याने घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकादरम्यान झाडाची फांदी तुटून मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळी. यामुळे मध्य रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळ दोन वाजेपर्यंत बंद करण्यात आलं आहे. तर पुढील सूचना येईपर्यंत मोनोरेल सेवा बंद असणार आहे.

 

 

First Published on: May 17, 2021 10:54 AM
Exit mobile version