पंतप्रधान मोदी दिलदार, लवकरच महाराष्ट्राला दीड हजार करोड मदत देतील – संजय राऊत

पंतप्रधान मोदी दिलदार, लवकरच महाराष्ट्राला दीड हजार करोड मदत देतील – संजय राऊत

भाजपाचे नेतृत्व ही भुताटकी, पंतप्रधानांबद्दल बोलताना राऊतांची जीभ घसरली

तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळला मोठा फटका बसला आहे. गुजरातमध्ये तौत्के चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी गुजरातचा दौरा करुन नुकसानीबाबत हवाई पाहणी केली. गुजरातला पंतप्रधा मोदींनी १ हजरा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये नुकसान झाले असल्यामुळे मोदींनी १ हजार कोटींची मदत केली लवकरच महाराष्ट्रासाठी १ हजार ५०० कोटींची मदत तर गोव्याला ५०० कोटींची मदत जाहीर करतील असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत मुंबईत माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी भाजवर निशाणा साधला आहे. तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका राज्यांना बसला आहे. गुजरातची पाहणी करुन मोदींनी १ हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी दिलदार आहेत महाराष्ट्रालाही ते १ हजार ५०० कोटींची मदत जाहीर करतील तसेच गोव्याला मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तिकडे ५०० कोटींची मदत करतील असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. मोदींनी गुजरातला मदत केली म्हणून आम्हाला दुःख असण्याचे कारण नाही परंतु कधीतरी पंतप्रधानांचे विमान महाराष्ट्राकडे वळे अशी आशा करतो असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते केंद्राकडे मदतीची मागणी करतील

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आहेत. नुकसान झालेल्या भागाचा ते आढावा घेत आहेत. फडणवीस कोकणाताली नुकसानीची केंद्र सरकारला सविस्तर माहिती देतील. त्यामध्ये फडणवीसांनी महाराष्ट्राला मदतीची मागणी करावी. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे शुक्रवारी कोकणचा दौरा करणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री केंद्राकडे मदतीची मागणी करतीलच असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

First Published on: May 20, 2021 2:18 PM
Exit mobile version