परळीत सपना चौधरीचा डान्स पहायला तुफान गर्दी

परळीत सपना चौधरीचा डान्स पहायला तुफान गर्दी

परळीमध्ये डान्स करताना सपना चौधरी

परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्वाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्त सोमवारी प्रसिध्द डान्सर सपना चौधरी यांच्या नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. सपनाच्या ठुमक्याने आणि अदाकाराने परळीकरांची मने जिंकली. सपना चौधरीचा डान्स पाहण्यासाठी परळीकरांनी तुफान गर्दी केली होती. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

सप्नाचा डान्स पहायला मोठी गर्दी

हरियाणाच्या सपना चौधरीचा डान्स पाहण्यासाठी एकच गर्दी करण्यात आली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवाद काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमला मराठवाड्यातील तरुणांईंनी मोठी गर्दी केली होती. सपना चौधरी येताच शीट्या आणी हूर्रेने तरुणाई बेभान झाली होती. चक्क मंडपाच्या खांबावर उभे राहून अनेक जण डान्स पहात होते. या अलोट गर्दीमध्ये अतिउत्साही तरुणानां रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा आणि लाठीचा वापर ही करावा लागला.

सप्नाने दिला सामाजिक संदेश

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी सपना चौधरी यांनी बेटी बचावो बेटी पडाओ, महिलांना सुरक्षित जगू द्या असा संदेश दिला. ‘तेरे आँखो का ए काजल’ या गाण्यावर सपना चौधरीच्या या नृत्याविष्काराने प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेतला. शेवटी गणपती बाप्पा मोरया म्हणतं सपना चौधरीने परळी करांचा निरोप घेतला.

First Published on: September 18, 2018 3:08 PM
Exit mobile version