सत्तापक्षातील नेत्यांनी गुंडगिरीचं समर्थन करणं लोकशाहीचं अधःपतन, दरेकरकर यांचा शिवसेनेवर निशाणा

सत्तापक्षातील नेत्यांनी गुंडगिरीचं समर्थन करणं लोकशाहीचं अधःपतन, दरेकरकर यांचा शिवसेनेवर निशाणा

ओमिक्रॉनच्या नावावर अधिकृत गोष्टी बंद करुन अनधिकृतपणे लूट करण्याचा डाव, दरेकरांचा ठाकरे सरकारवर आरोप

श्रीराम मंदिरासाठीच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपाविरोधात भाजपने मुंबईत फटकार मोर्चा काढला होता. शिवसेना भवनासमोर हा मोर्चा काढण्यात आला होता परंतु मोर्चामध्ये शिवसेनेकडून मारहाण झाल्याचा आरोप भाजप महिला पाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तसेच पक्षातील प्रमुख नेत्यांनी या मोर्चाचे समर्थन केलं आहे. यावरुन शिवशाहीचे राज्य आहे की गुंडशाहीचे राज्य आहे? असा सवाल करत शिवशाहीचे नाव आता गुंडशाही करावं असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनाला लगावला आहे.

सत्तेतील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी गुंडगिरीच समर्थन करणं हे लोकशाहीचं अधःपतन आहे. यामुळे अशा प्रकारेच संजय राऊत यांनी सर्टीफिकेशन केलं परंतु दुसऱ्या दिवशी या राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. उलट सरकारमधील मंत्रीच सांगत होते की, कायदा सुव्यवस्था पाळण्याचे काम आपलं आहे. हे एका बाजूला सांगत असताना दुसऱ्या बाजूला कौतुक सुरु आहे. यामुळे शिवसशाहीचे राज्य सुरु आहे की, गुंडशाहीचे राज्य चाललं आहे. याचा विचार करण्याची आवश्यकात आहे. आणि शिवशाहीचे नाव बदलून गुंडशाही करावे तेच सर्टिफाईड होईल अशी सूचना प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

आम्ही सर्टीफाईड गुंड आहोत

शिवसेने गुंडगिरी करते परंतु सत्तेचा माज म्हणाल तर ते चुकीचं असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपच्या फटकार मोर्चात जर सत्तेचा माज दाखवला असता तर वेगळ्या पद्धतीचा राडा झाला असता. गुंडगीरी म्हणाल तर शिवसैनिकांच्या आंगावर जर कोणी याल खासकरुन शिवसेना भवनावर तर आम्ही गुंड आहोत. शिवसेना भवन राज्याच्या अस्मितेचं प्रतिक आहे. मराठी माणसाचं योगदान त्या वास्तुमधी आहे. बाळासाहेब ठाकरे स्वतः त्या वास्तुमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करत होते त्या वास्तुच्या दिशेने कोणी चाल करत असेल तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टीफाईड गुंड आहोत असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

First Published on: June 18, 2021 4:33 PM
Exit mobile version