जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही; देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही; देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. बुलढाण्यात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे. जी कर्जमुक्ती आम्ही केली तिचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. ()

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?

देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, याठिकाणी आम्हाला आनंद होतो आहे. त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये साडेसहा हजार कोटी रुपये वीजबिल भरलेले आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी फटाके फोडतो की त्या ठिकाणी आवाज जाईल, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावलाय. या ठिकाणी आणि त्या ठिकाणी करताय ना. मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहे. वीजबिल माफ करा, शेतकऱ्यांच्या बिलाचे साठलेले पैसे तुम्ही द्या आणि शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करा.

चला या ठिकाणी आणि त्या ठिकाणी होऊन जाऊ द्या. वरती बसल्यावर वेगळी भाषा आणि खाली उतरल्यावर वेगळी भाषा, जी कर्जमुक्ती आम्ही केली होती, तिचा लाभ यांना मिळाला की नाही ते विचारा. जी कर्जमाफी तुम्ही केली होती, त्या अटी किती होत्या. कर्जमाफ किती लोकांचं झालं हेसुद्धा विचारा, माझं जाहीर आव्हान आहे. पश्चिम विदर्भाचा भाग राहिला होता, कारण जेव्हा आपण कर्जमाफी आणि कर्जमुक्ती जाहीर केली, तेव्हा ती योजना 31 मेपर्यंत पूर्ण करायची होती.

दुर्दैवानं कोरोनाचं संकट आलं आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली. पण आपण स्वतः सरकारने गॅरंटी दिली आणि त्यांचं कर्जसुद्धा माफ करायला लावलं होतं. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा आणि पूर्तता सुरू करत होतो आणि या रेड्यांनी शेण खाल्लं. कोणाचं नुकसान झालं, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.


हेही वाचा – …तर गद्दारांनी सांगावे भाजपाच्या तिकिटावर लढणार नाही, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आवाहन

First Published on: November 26, 2022 8:10 PM
Exit mobile version