शिवसेनेने राज्यपालांना पत्र म्हणजे रडीचा डाव, दीपक केसरकरांचं टीकास्त्र

शिवसेनेने राज्यपालांना पत्र म्हणजे रडीचा डाव, दीपक केसरकरांचं टीकास्त्र

शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिणं म्हणजे रडीचा डाव असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचण्यास अडथळे येते होते, असं देखील केसरकरांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचं पत्र शिवसेनेने राज्यपालांना दिलं आहे, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता केसरकर म्हणाले की, हे लहान मुलांच्या स्वभावासारखं आहे. ज्याची स्टम्प आणि बॅट असते, तसेच तो आऊट झाल्यानंतर तो त्याची स्टम्प आणि बॅट घेऊन निघून जातो, याला रडीचा खेळ म्हणतात. त्यामुळे शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यापासून दूर रहायला पाहीजे, असं दीपक केसरकर म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या हे सीए आहेत. ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी लोकं त्यांना गंभीरपणाने घेतात. कारण त्यांचं या क्षेत्रामध्ये ज्ञान प्रचंड आहे. त्यांचा या ज्ञानाचा वापर जर महाराष्ट्राला झाला तर महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खूप सुधारू शकते. त्यामुळे एक विद्ववान गृहस्थ म्हणून त्यांच्याबद्दल मला एक आदर आहे. परंतु शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणं हे योग्य नाहीये. त्यामुळे मी सोमय्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोललो आहे, असं केसरकर म्हणाले.

राणेंनी ठाकरेंबद्दल अपशब्द काढला असेल असं मला वाटत नाही. परंतु त्यांची मुलं लहान आहेत. त्यामुळे त्यांना समजावण्याचं काम देवेंद्र फडणवीस शंभर टक्के करतील. राणेंनी उद्धव ठाकरे यांच्याबदद्ल स्टेटमेंट करणं मी समजू शकतो. कारण त्यांचं वय तेवढं आहे, असं म्हणत केसरकरांनी राणेंवर टीका केली.


हेही वाचा : बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर बंडखोरांचा समाचार घेतला असता : संजय राऊत


 

First Published on: July 13, 2022 11:35 AM
Exit mobile version