बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेला तर धनुष्यबाणही कामाला येणार नाही, दीपक केसरकरांनी सुनावले

बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेला तर धनुष्यबाणही कामाला येणार नाही, दीपक केसरकरांनी सुनावले

माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा. शिवसेनेत बंडखोरांनी फूट पाडली नाही तर ती भाजपाने पाडली. भाजपच्या शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. याला बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे.

दीपक केसरकरांचे उत्तर –

बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलात, तर धनुष्यबाणही तुमच्या कामाला येणार नाही, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. त्यांनी पुढे तुम्ही करताय ते योग्य आणि आम्ही करतोय ते अयोग्य, असं होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बाळासाहेबांनी कधी युती केली असती का?, असा प्रश्न दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर आता जी विधाने होत आहेत, त्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, असे मत दीपक केसरकरांनी व्यक्त केले

त्याचा शिवसेना वाढीसाठी उपयोग करा –

शिवसेनेतील खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज शिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती आहे. त्याचा शिवसेना वाढीसाठी उपयोग करा, ही आलेली संधी आहे. तुम्हाला आता एकच काम देतोय, ते म्हणजे नोंदणी. नोंदणीचे  गठ्ठे घेऊन या, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांना घेऊन काम करा, असेही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितले.

First Published on: July 21, 2022 7:05 PM
Exit mobile version