आपले आमदार सांभाळा नाहीतर.., दीपक केसरकरांचा इशारा

आपले आमदार सांभाळा नाहीतर.., दीपक केसरकरांचा इशारा

deepak kesarkar

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कुणाची?, यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर आहेत. आपले आमदार सांभाळा नाहीतर एक आमदार अगोदरच गेला आहे. त्यामुळे इतर गेले तरी कळणार नाही. त्यामुळे चुकीची वक्तव्यं करू नका, असा सल्ला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.

दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिक्षकांकडे विद्यार्थ्यी घडवण्याची जबाबदारी दिली पाहीजे. राष्ट्रीय जबाबदारी सोडून त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला जात असेल तर त्याबद्दल आपण निश्चितच पुनर्विचार करू, असंही केसरकर म्हणाले.

शिक्षकांकडून अतिरिक्त कामं कोण करुन घेत असेल तर ते चुकीचे आहे. मात्र, राष्ट्रीय कामे त्यांच्याकडून करून घेतलीच पाहीजेत. अन्य कामे त्यांच्याकडून कोण करून घेत असेल तर या प्रकाराची चौकशी केली जाईल, असंही केसरकर म्हणाले.

आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या विधानावर मंत्री केसरकर म्हणाले की, याबाबत आपल्याला अद्यापर्यंत माहिती घेतली नाही. त्यामुळे मी कोणतेही वक्तव्य करणार नाही, असं केसरकर म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री शिंदेंनी चर्चांना पुर्णविराम दिला आहे.


हेही वाचा : राज ठाकरे यांची केवळ सदिच्छा भेट घेतली; एकनाथ शिंदेंचे


 

First Published on: September 1, 2022 10:12 PM
Exit mobile version