उद्यापासून ठाकरेविरोधी मोहीम; आमच्या नेत्याचा अनादर नको सांगणाऱ्या केसरकरांनीच केला हल्लाबोल

उद्यापासून ठाकरेविरोधी मोहीम; आमच्या नेत्याचा अनादर नको सांगणाऱ्या केसरकरांनीच केला हल्लाबोल

मुंबई – ठाकरे गटाला आव्हान देत शिंदे गटाने फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, शिंदे गटात गेलेले सर्व आमदार गद्दार असल्याची मोहीम ठाकरे गटाने चालवली. त्यामुळे संतापलेल्या शिंदे गटातील प्रवक्ते आता उद्यापासून ठाकरेविरोधी मोहीम राबवणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेचा कसा विश्वासघात केला हे उद्यापासून आमचा प्रवक्ता सांगणार आहे. त्याचा संपूर्ण घटनाक्रम उदय सामंत उद्या सांगतील.’ आज पत्रकार परिषद घेऊन दीपक केसरकरांनी ही माहिती दिली

हेही वाचा – मोहित कंबोज यांचा रोख अजित पवारांवर नाहीच, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबाबत निंबाळकर म्हणाले…

२०१९ च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा मान राखला. मी फडणवीसांसोबत वर्षावर होतो. तर मातोश्रीवर एकनाथ शिंदे होते. आम्ही चर्चा करत होतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा नक्की कोणी विश्वासघात केला हे कळलं पाहिजे. मराठी माणसाचा स्वाभिमान त्यावेळी राखला जाईल हे आम्ही पाहिले, त्यासंदर्भात तुम्ही काय केलं? असा सवाल दीपक केसरकर यांनी ठाकरेंना विचारला आहे.

मी मोठ्या माणसांचा आदर करतो. म्हणून मी तो शब्द उच्चारत नाही. बंद खोलीत चर्चा करता. बंद खोलीत कोणती आश्वासनं देऊन दिल्लीतून परत येता आणि प्रत्यक्षात काय करता हे सुद्धा कळलं पाहिजे. महाराष्ट्रात जे काही चाललं आहे तो इतिहास या मुलांनी वाचला पाहिजे. ग्लोबेस नितीला बळी पडू नका. मी तळमळून मनापासून काम करणारा माणूस आहे. आम्ही एक मिनिट थांबत नाही. आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. अडीच वर्षांत फक्त राजकारण केलं. अडीत वर्षात काय केलं ते दाखवा. आम्हालाही जीभ आणि विचार दिलेत इश्वराने दिले. पण आम्ही लोकांसाठी काम करतो. आम्ही १२-१२ तास काम करतो. आमच्याबद्दल हे लोक का म्हणतात. आमच्याबद्दल जनतेला बोलायचा अधिकार आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा – जळगावात तणाव : दौरा सुरू होण्यापूर्वीच फाडले आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर

विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधक ज्या घोषणा देतात त्यावर मी उद्या पुन्हा सविस्तर बोलणार आहे. तुर्तास मला माझ्या विभागाचेही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे उद्यापासून आमचा प्रत्येक प्रवक्ता बोलणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा कसा विश्वासघात कसा केला हे उद्यापासून आमचा प्रवक्ता सांगणार आहे, असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं.

मराठी माणसाची सत्ता मुंबईवर राहिली पाहिजे अशी बाळासाहेबांची भूमिका होती. लोकांचा पाठिंबा असतानाही भाजपाने त्यावेळी पदे घेतली नाही. त्यांनी एवढा त्याग केला. मने दुखावली असतीलही. पण बोलून चर्चा करायला हवी. सत्तेबाबत
शहांसोबच चर्चा झाली. मोदींसोबतही झाली. त्यांना दिलेला शब्द तुम्ही पाळला की नाही, हे आता आम्ही सांगणार आहोत.  आम्ही जनतेसोबत आहोत. लोकशाहीच्या रक्षणासाठी पद धोक्यात आणले. सहजासहजी आमदारपद कोणी सोडत नाही. आपल्या पदाला आव्हान कोणी देत नाही.

आमची पर्मनंट युती

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आता आमची पर्मनंट युती झाली आहे. आम्ही आमच्या स्वार्थासाठी युती तोडणार नाही. आता ही युती कायमस्वरुपी राहणार आहे.

First Published on: August 20, 2022 1:08 PM
Exit mobile version