देगलूरमध्ये भाजपला आघाडी दिल्यास गाव जेवण देईल, चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर

देगलूरमध्ये भाजपला आघाडी दिल्यास गाव जेवण देईल, चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर

farm laws: देशात नेहमी चांगल्याला विरोध केला जातो, कृषी कायद्यांवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

देगलूर -बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देईल अशी खुली ऑफर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपकडून देगलूर पोटनिवडणुकीसाठी सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील स्वतः प्रचारासाठी देगलूरमध्ये तळ ठोकून आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपची सत्ता आणण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना खुली ऑफर दिली आहे. यापुर्वी सांगली महानगरपालिकेच्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला शॉक दिल्यास सोन्याचा मुकुट घालेन अशी ऑफर दिली होती. तर आता देगलूरमध्ये भाजपला आघाडी दिल्यास मी तुम्हाला गाव जेवण देईन अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ही ऑफर दिली आहे.

देलगूरमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते यावेळी ते म्हणाले की, भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्याकडून गावजेवण देईल. या गावजेवणमध्ये मी स्वतः सहभागी होणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

देलगूरच्या प्रचारात केंद्रीय मंत्र्यांचा समावेश

भाजपने देगलूर पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापासून आमदार आणि केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भागवत कराड हे नेते प्रचार करत आहेत. देगलूरमध्ये सर्व नेते गावागावात जाऊन सभा घेत आहेत.


हेही वाचा : मोठी कारवाई! सायनमधून २१ कोटींची हेरॉईन जप्त; एक महिला ड्रग्ज पेडलर गजाआड


 

First Published on: October 20, 2021 2:33 PM
Exit mobile version