परतीच्या प्रवासासाठी रेल्वेला पसंती,चाकरमान्यांकडून अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी!

परतीच्या प्रवासासाठी रेल्वेला पसंती,चाकरमान्यांकडून अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी!

स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वेची मोठी घोषणा, दररोज धावणार ७ हजारहून अधिक गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात गेल्या चाकरमान्यांनी आता परतीच्या प्रवासाला रेल्वेला पंसती दिली आहे. २८ ते ३१ ऑगस्ट पर्यतच्या रेल्वेचे आरक्षण आरएसी आणि प्रतीक्षा यादीत गेले आहे. तसेच २३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर पर्यत धावणार्‍या एसटीचे आरक्षण सुध्दा हाऊस फुल झाले आहे. त्यामुळे मुंबईकडे येणार्‍या चाकरमान्यांनी आता रेल्वेला पंसती दिसल्याचे दिसून येत आहे.

रेल्वे एसटी हॉउसफुल होण्याचा मार्गांवर

गौरी गणपतीच्या उत्सवासाठी  कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीने ६ ऑगस्ट आणि रेल्वेने १५ ऑगस्टपासून रेल्वे सेवा सुरु केली आहे. मात्र हे सेवा सुरु करताना बराच उशीर लावल्याने चाकरमान्यां या एसटी आणि रेल्वेच्या काही फायदा होताना दिसून आलेल्या नाही. आता मात्र आता कोकणातून परतीच्या प्रवासासाठी येणार्‍या चाकरमान्यांनी एसटी आणि रेल्वे पंसती देत असल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी व सावंतवाडी स्थानकांमधून लोकमान्य टिळक टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणार्‍या सर्व गाड्यांचे २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंतचे आरक्षण आरएसी आणि प्रतीक्षा यादीत गेले आहे. तसेच या गाड्यांच्या सेकण्ड आणि स्लीपर क्लासला प्रवाशांनी पसंती दिली आहे. याशिवाय मुंबईच्या उपनगरीय रेल्वेने सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची बंदी असल्याने कोकणातुन मुंबईत उतरण्यासाठी पनवेल ऐवजी थेट ठाणे, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर जाणार्‍या गाड्यांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. या गाड्या रात्रीच्या वेळस धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी मध्य रेल्वेला सध्या धावत नसलेल्या तुतारी एक्सप्रेसचे डबे वापरून सावंतवाडी ते मुंबई व इंद्रायणी किंवा डेक्कन एक्सप्रेस या गाड्यांचे डबे वापरून रत्नागिरी ते मुंबई अशा दिवसा प्रवास करणार्‍या गाड्या सोडण्याची विनंती केली आहे. ह्या गाड्या मुंबईतून रात्री निघून रत्नागिरी व सावंतवाडीला सकाळी पोहोचून तिकडून दिवसा परत निघून संध्याकाळी किंवा रात्री मुंबईला पोहोचू शकतील,जेणेकरुन प्रवाशांना दिलासा मिळु शकेल. मध्य व कोकण रेल्वेने लवकरात लवकर याचे नियोजन करून ह्या गाड्यांची घोषणा केल्यास जास्तीत जास्त लोकांना आरक्षण करण्याची संधी मिळणार आहे.

First Published on: August 23, 2020 8:50 PM
Exit mobile version