यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि ग्रोव्हर्स डायरेक्ट इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि संबंधित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. १७, १८, १९ फेब्रुवारी या तीन दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ यादरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हे तांदूळ प्रदर्शन आणि विक्री होणार आहे.

सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन केले. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन तांदूळ वाणाची माहिती, तांदूळ कसा व किती रुपयांनी विक्री करणार आहात याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. या महोत्सवामुळे राज्यभरातील तांदूळ थेट शहरी उपभोक्त्यांना खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

यावेळी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संस्थांमार्फत वेगवेगळ्या वाणांचे सुमारे ४० प्रकारचे तांदूळ येथे आणले गेले आहेत. ठाणे आणि पालघरचा वाडा कोलम, मावळ आणि मुळशीचा इंद्रायणी आणि आंबेमोहोर, आजऱ्याचा घनसाळ, चंद्रपूर आणि विदर्भातील श्रीराम कोलम, अकोले आणि नाशिक येथील आदिवासी उत्पादित ब्लॅक, रेड, ब्राउन राईस इत्यादी पारंपरिक तसेच संशोधित तांदळाच्या वाणांची उपलब्धता याठिकाणी आहे. विविध प्रकारच्या तांदूळ वाणांबद्दल जागरूकता निर्माण होऊन आणि या वाणांची मागणी उत्तरोत्तर वाढून त्याचा दिर्घकालीन लाभ तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना होईल असे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

राज्यभरातील तांदूळ आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ थेट पणे उपलब्ध व्हावी आणि शहरी नागरिकांना विविध प्रकारच्या तांदळाच्या खात्रीशीर वाणांची एकाच ठिकाणी किफायतशीर किमतीत वर्षभराच्या तांदळाची एकदम खरेदी करता यावी या व्यापक उद्देशातून हा तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.


हेही वाचा – औरंगाबादसह देशातील १३ विमानतळांचं लवकरच होणार नामकरण, कॅबिनेट मंजुरीसाठी प्रस्ताव येणार – डॉ. भागवत कराड


First Published on: February 17, 2022 2:49 PM
Exit mobile version