‘दुध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कायम राहणार’

‘दुध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कायम राहणार’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘लॉकडाऊन’च्या घोषणेचे पालन नागरिकांनी करून घरीच थांबावे. दुध,भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. हा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, घराबाहेर पडून खरेदीसाठी गर्दी करु नये’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

तीन महिन्यांचे अन्नधान्य उपलब्ध करण्याचाही विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसाच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली असली तरी आपल्या राज्यात आधीपासूनच संचारबंदी लागू आहे. संचारबंदीच्या काळातही नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम ठेवण्याबाबत सरकारने खबरदारी घेतली आहे. राज्यातील गरीब, दुर्बल घटकांना रेशन दुकानांवरुन तीन महिन्यांचे अन्नधान्य उपलब्ध करण्याचाही विचार सुरु आहे. राज्यसरकारकडून जनतेची कुठलीही अडचण होऊ दिली जाणार नाही, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री महोद्यांनी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, घराबाहेर पडून ‘कोरोना’च्या संसर्गाला बळी पडू नये. हा संसर्ग आपल्या घरच्यांपर्यंत नेऊ नये, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी दवाखाने, हॉस्पिटल, वैद्यकीय सेवा आणि अत्यंत निकडीच्या वेळी वाहतुकसेवाही उपलब्ध केली जाईल. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत सरकार त्यांच्यासोबत आहे. परंतु आता प्रत्येकाने आपापल्या घरात थांबूनच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाचं पालन करावं आणि घरीच थांबावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.


हेही वाचा – Big Breaking: आज रात्री १२ वाजल्यापासून संपुर्ण देशात लॉकडाऊन – पंतप्रधान मोदी


First Published on: March 24, 2020 11:56 PM
Exit mobile version