उपमुख्यमंत्री पहिले, मुख्यमंत्री दुसरे तर अजित पवार तिसरे…; यात मारली बाजी!

उपमुख्यमंत्री पहिले, मुख्यमंत्री दुसरे तर अजित पवार तिसरे…; यात मारली बाजी!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुर महापालिका पहिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे महापालिका दुसरी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची पिंपरी चिंचवड महापालिका तिसरी क्रमांकाची ठरली आहे. शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलाय.

नगरविकास दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा निकाल जाहीर करण्यात आलाय. मात्र हा निकाल सध्या चर्चेत आलाय. या निकालाच्या क्रमवारीमुळे सध्या या निकालामध्ये भविष्यात होऊ शकणाऱ्या राजकीय घडामोडीचे संकेत दडले आहेत की काय, असा प्रस्न आता उपस्थित होऊ लागलाय.

राष्ट्रवादी नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उत आला होता. ते प्रकरण आता शांत झालं आहे. ते राष्ट्रवादी सोडून, 40 एक आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार आणि मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यावर ब्रेक स्वत: अजित पवार यांनीच लावले आहे. त्यामुळे ते काही भाजपमध्ये जाणार नाहीत हे नक्की झालं आहे. एकीकडे त्यांनी स्पष्टीकरण दिलं असतानाही आता शहर सौंदर्यीकरण स्पर्धेच्या निकालाच्या निमित्ताने अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा तर्क वितर्क लावले जात आहेत.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज कुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगरानी, नगरविकास विभाग २ चे सोनिया सेठी, किरण कुळकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

(सविस्तर वृत्त लवकरच)

First Published on: April 20, 2023 1:39 PM
Exit mobile version