पर्यटन, एज्युकेशन, मेडीकल हब या त्रिसुत्रीवर नाशिकचा विकास

पर्यटन, एज्युकेशन, मेडीकल हब या त्रिसुत्रीवर नाशिकचा विकास

उत्तम पर्यावरण आणि हवामान असलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये नाशिकचा समावेश होतो. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी मी पालकमंत्री झाल्यानंतर नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींशी बोलतांना नाशिकमध्ये धूर फेकरणारे कारखाने नकोत तर चांगल्या एज्युकेशन संस्था, पर्यटन क्षेत्रे आणि उत्तम आरोग्य सेवेचा विचार रूग्णालये हवीत. याकरीता पर्यटन, एज्युकेशन आणि मेडकल हब या त्रिसुत्रीवर नाशिकचा विकास व्हावा ही संकल्पना मांडली आज ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात येत असलेल्या शालीमार येथील विभागीय संदर्भ रूग्णालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप नेत्या पंकजा मुंडे, नाशिक प्रभारी तथा माजी मंत्री जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, कोरोना काळात आरोग्य सेवेचे महत्व अधोरेखित झाले. या रूग्णालयाच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त नाशिककरांना आरोग्यदायी भेट मिळत असल्याचा आनंद आहे. नाशिकचे हवामान चांगले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून बोट क्लब, सप्तश्रृंगी गडावर फर्निक्युलर ट्रॉली, नाशिक त्र्यंबक हरित मार्गाचा विकास करण्यात आला. दर्जेदार शिक्षण देणारया संस्था नाशिकमध्ये उभ्या राहील्या. आरोग्य सेवेसाठी उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबई, पुण्याला जाण्याची गरज भासू नये याकरीता नाशिकमध्ये उत्तम दर्जाची वैद्यकिय सेवा देणारी रूग्णालये उभी राहत आहेत. लवकरच नाशिकमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या इमारतीमुळे १०५ खाटा वाढणार
या नवीन इमारतीमुळे १०५ खाटा वाढणार आहेत. नवीन इमारतीत ३० खाटांचे पेडियाट्रीक विभाग, ३० खाटांचे न्युरोसर्जरी विभाग, ३० खाटांचे प्लास्टिक सर्जरी विभाग व १५ खाटांचे एनआयसीयु असणार आहेत. या कामासाठी शासनाकडून १६ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

First Published on: November 1, 2021 12:31 PM
Exit mobile version