अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितले छापेमारीचे कारण

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितले छापेमारीचे कारण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. कारखान्याप्रकरणी आणि दलालांकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छापेमारी करण्यात येत आहे. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि बहिणींच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली आहे. अजित पवारांसंबंधीत व्यक्तींवर कारवाई करण्यात येत नसून ज्यांच्या साखर कारखान्यांविरोधात वारंवार तक्रारी आल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. आयक विभागाच्या छापेमारीत १०५० कोटी रुपयांची दलाली कशाला म्हणतात ही त्याचे पुरावे सापडले आहेत यामुळे कारवाईला राजकीय स्वरुप देणं चुकीचे असल्याचेही फडणवीसांचे म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधीत व्यक्तींवर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. आयटी विभागाने दोन प्रकारचे छापे असल्याचे सांगत ही कारवाई देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटलं आहे. यातील पहिली कारवाई गंभीर आहे. १०५० कोटी रुपयांची दलाली कशाला म्हणतात त्याचे पुरावे सापडले आहेत. यामध्ये बदल्या, टेंडर, मंत्री, अधिकारी आहेत. महाराष्ट्रात नव्हे तर देशातील सर्वात मोठा पुरावा या छापेमारीत सापडला आहे. हे अत्यंत गंभीर आहे. पुरावा मिळाल्यानंतर त्याला राजकीय स्वरुप देणं हे चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

तक्रारी असलेल्यांवर कारवाई

तसेच काल, परवा झालेल्या रेडमध्ये पाच साखर कारखान्यांच्या विक्रीच्या संदर्भात तक्रार होती त्याची चौकशी झाली. यामध्ये प्रक्रिया चुकीची आहे. त्यापेक्षा विकत घेताना जे फंड आले ते चुकीचे आले आहेत. काळ्या पैशावर आणि लाचेच्या पैशावर टॅक्स भरून तो पांढरा करु शकत नाही हा नियम आहे. त्यामुळे कारखाना खरेदी करण्याचा पैसा योग्य असला पाहिजे. परंतु तक्रारी अशा होत्या की कारखान्यांच्या खरेदी वेळी ज्या कंपन्यांमधून पैसा आला आहे तो पैसा योग्य नाही याची चौकशी आयटी विभागाकडून करण्यात आली आहे. या कारखान्यांच्या संचालकांवर छापा टाकण्यात आला आहे. पवार कुटुंबीयांवर छापा टाकण्यात आला नाही पवार कुटुंबीयांचे अनेक नातेवाईक आहेत त्यांच्याकडे आयकर विभागाने छापेमारी केली नाही अशी प्रतिक्रया फडणवीस यांनी दिली आहे.


हेही वाचा : NCB ने राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीलाही सोडलं, फडणवीसांची नवाब मलिकांच्या आरोपावर प्रतिक्रिया


 

First Published on: October 9, 2021 9:02 PM
Exit mobile version