भाजप खासदाराच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे देवेंद्र फडणवीसांकडून खंडन

भाजप खासदाराच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे देवेंद्र फडणवीसांकडून खंडन

देवेंद्र फडणवीस

तीन दिवसांचे मुख्यमंत्री म्हणून विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान कर्नाटकातील भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसाचे मुख्यमंत्री का झाले? याचे स्पष्टीकरण देणारे खळबळजनक वक्तव्य केले आहे. केंद्राचा ४० हजार कोटी रुपयांचा निधी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाले असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याचे खंडन केले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राज्यातील बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत भाजप आमदाराच्या वक्तव्याचे खंडन केले आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात महाराष्ट्र सरकारकडे केवळ भू-संपादनाची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्राला पैसे देणे किंवा स्वीकारणे अशी कोणतीच बाब यामध्ये येत नाही. त्यामुळे भाजप खासदाराने केलेले वक्तव्य त्याचप्रमाणे त्या वक्तव्याच्या आधारे इतर कोणी आरोप किंवा वक्तव्य करत असेल तर मी त्या सर्व आरोप आणि वक्तव्यांचे खंडन करतो.

ही तर महाराष्ट्रासोबत गद्दारी

दरम्यान भाजप खासदार हेगडे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा ४० हजार कोटींचा विकासनिधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे सांगत आहेत. ही महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे, असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

First Published on: December 2, 2019 12:06 PM
Exit mobile version