इम्पेरिकल डेटासाठी भुजबळांनी पुढाकार घ्यावा, आम्ही पाठिंबा देऊ – फडणवीस

इम्पेरिकल डेटासाठी भुजबळांनी पुढाकार घ्यावा, आम्ही पाठिंबा देऊ – फडणवीस

इम्पेरिकल डेटासाठी भुजबळांनी पुढाकार घ्यावा, आम्ही पाठिंबा देऊ - फडणवीस

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आज राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ हे इम्पेरिकल डेटासंदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते असं सांगत फडणवीस यांनी इम्पेरिकल डेटासाठी भुजबळांनी पुढाकार घ्यावा, आम्ही पाठिंबा देऊ, असं म्हटलं.

“छगन भुजबळ आज मला भेटायला आले होते. ओबीसी राजकीय आरक्षण हाच त्यासंदर्भातला विषय होता. इम्पेरिकल डेटा कसा गोळ करता येईल यासंदर्भात तुमचं काय मत आहे, हे ऐकूण घेण्यासाठी आलो आहे, असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना हे सांगितलं की मराठा आरक्षणाच्यावेळी आम्ही आमचं सरकार असताना कसा इम्पेरिकल डेटा जमा केला आणि तो सर्वोच्च न्यायालयाने कसा वैध ठरवलेला आहे. आताही तो कसा करता येईल हे सांगितलं. हे देखील सांगितलं की त्यांनी पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्यात आणि त्याला आम्ही पूर्ण मदत करु. मी स्वत: वैयक्तिकरित्या मला जे काही वाटतं त्यासंदर्भात नोड देखील तयार करुन द्यायला तयार आहे. आपण एकत्रितपणे काम करु मला काही अडचण नाही आहे, तुमच्यासोबत काम करु, तुम्ही त्याचं नेतृत्व करा…कारण सत्तारुढ पक्षाला नेतृत्व करावं लागतं आम्ही पूर्णपणे त्यामध्ये मदत करु,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

छगन भुजबळ थेट फडणवीसांच्या भेटीला

छगन भुजबळ यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं, अशी खुली ऑफर देत फडणवीसांनी केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा, असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर आज भुजबळ थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले.

 

First Published on: July 15, 2021 12:16 PM
Exit mobile version