नाना पटोलेंच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी-शिवेसेनेला कापरं भरलंय, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला

नाना पटोलेंच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी-शिवेसेनेला कापरं भरलंय, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर घणाघात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं असल्याचा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर असून नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी मृत मनोज ठावकरच्या कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. तर मनोज ठावकरच्या हत्येची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या कुरबुरीवर फडणवीस यांनी परखड टीका केली आहे.

शिवसेना राष्ट्रवादीला कापरं भरलय

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपुरमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांच्या मारहाणीत मृत पावलेल्या मनोज ठावकरच्या कुटूंबीयांची फडणवीसांनी भेट घेतली आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधला असताना फडणवीस यांना नाना पटोलेंवर मुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याच्या गंभीर आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कापरं भरलं आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेला जेवण जात नाही, पाणी देखील पिता येत नाही आहे. ते अत्यंत घाबरले असल्यामुळे त्यांना नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली आहे. असं आता नाना पटोलेंच्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं पाहिजे ते इतके का घाबरले आहेत? नेमकं कारण काय? का पाळत ठेवली आहे? असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

पोलिसाच्या मारहाणीमुळेच मनोजचा मृत्यू

नागपूरमध्ये मनोज ठावकरचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. मृत मनोजच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. कुटुंबीयांना भाजपकडून २ लाखांची मदत केली असून राज्य सरकारकडूनही मदत मिळवून देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मनोजने हेल्मेट आणि मास्क घातला नसल्यामुळे त्याला पोलिसांनी २ लाठ्या तुटेपर्यंत मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला यामुळे ही हत्या आहेत. आयुक्तांनी ही केस सीआयडी कडे सुपुर्द केली आहे. कारवाई होईपर्यंत दोन्ही पोलिसांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लाठ्या तुटेपर्यंत मारण्याचा अधिकार नाही

मनोज गुन्हेगार नव्हता तसेच मात्र त्याने हेल्मेट आणि मास्क लावला नाही, हाच त्याचा गुन्हा मात्र ह्यात दंड आकारला जातो अशा प्रकारे दोन लाठ्या तुटेपर्यंत मारण्याचा अधिकार कायद्यात नाही असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे. अशा प्रकारे कोणी मारत असेल तर ही हत्याच आहे. मनोजच्या हत्येबाबत कारवाई होत नसेल तर आम्ही शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

First Published on: July 12, 2021 3:25 PM
Exit mobile version